इस्राएलाचे तग धरून राहण्याचे गीत
आरोहणाचे गीत.
129 1 “माझ्या तारुण्यापासून त्यांनी मला फार पीडले आहे” — आता इस्राएलाने म्हणावे — 2 “माझ्या तारुण्यापासून त्यांनी मला फार पीडले आहे, तरी त्यांचे माझ्यावर काही चालले नाही.” 3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपले तास लांब केले. 4 आमचा पिता नीतिमान आहे; त्याने दुष्टांचे बंध तोडून टाकले आहेत.
5 सीयोनेचा द्वेष करणारे सर्व लज्जित होऊन मागे परतवले जावोत. 6 ते छपरावरील गवतासारखे होवोत, जे वाढण्यापूर्वीच सुकून जाते, 7 ज्याने कापणारा आपला हात भरत नाही, आणि पेंढ्या बांधणारा आपली बाहू भरत नाही, 8 आणि जवळून जाणारे असे म्हणत नाहीत, “आमच्या पित्याचा आशीर्वाद तुमच्यावर असो! आम्ही आमच्या पित्याच्या नावाने तुम्हांला आशीर्वाद देतो.”