अश्दोद अश्शूराच्या हाती पडते
20 1 अश्शूराचा राजा सर्गोन याने पाठवलेला सेनापती अश्दोदास आला त्या वर्षी, त्याने अश्दोदाशी लढाई केली व ते काबीज केले.
2 त्या वेळी आमच्या पित्याने आमोजाचा पुत्र यशया याच्याद्वारे म्हटले, “तुझ्या कमरेचे तरट सोड आणि तुझ्या पायांतील वहाणा काढून टाक.” त्याने तसे केले, आणि तो उघडा व अनवाणी चालत राहिला. 3 मग आमचा पिता म्हणाला, “जसा माझा सेवक यशया तीन वर्षे उघडा व अनवाणी चालला, तसे मिसर व कूश यांच्याविरुद्ध चिन्ह व शकुन म्हणून, a a v3 कूश हे त्या प्रदेशाचे प्राचीन नाव आहे, जो आता सुदान व उत्तर इथिओपिया यांनी व्यापलेला आहे. 4 तसाच अश्शूराचा राजा मिसराच्या बंदिवानांना व कूशाच्या हद्दपार झालेल्यांना, तरुण व वृद्ध, नग्न, अनवाणी, उघड्या नितंबांनी हाकून नेईल—मिसराची लाज उघड करील. 5 तेव्हा ते आपली आशा असलेल्या कूशामुळे व आपला अभिमान असलेल्या मिसरामुळे खचून जातील व लज्जित होतील. 6 त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील लोक म्हणतील, “पाहा, अश्शूराच्या राजापासून सुटका होण्यासाठी मदतीकरिता जिकडे आम्ही पळून गेलो, त्या आमच्या आशेचे काय झाले! आता आम्ही कसे निसटणार?”