पाश तुटला आहे
आरोहणाचे गीत. दाविदाचे.
124 1 जर आमचा पिता आमच्या बाजूने नसता तर—आता इस्राएलाने हे म्हणावे— 2 जेव्हा माणसे आमच्याविरुद्ध उठली, तेव्हा जर आमचा पिता आमच्या बाजूने नसता, 3 तर त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते, जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरुद्ध भडकला; 4 तर पाण्याने आम्हांला वाहून नेले असते, लोंढ्याने आमच्यावरून वाहून गेला असता; 5 तर खवळलेले पाणी आमच्यावरून वाहून गेले असते.
6 धन्य असो आमचा पिता, ज्याने आम्हांला त्यांच्या दातांचे भक्ष्य होऊ दिले नाही! 7 पारध्यांच्या पाशातून पक्ष्याप्रमाणे आम्ही सुटलो आहोत; पाश तुटला आहे, आणि आम्ही सुटलो आहोत! 8 आमचे साहाय्य आमच्या पित्याच्या नावात आहे, ज्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली.