स्वर्गाकडे उंचावलेले डोळे
आरोहणाचे गीत.
123 1 तुझ्याकडे मी माझे डोळे उंचावतो, हे स्वर्गात राजासनी विराजमान असणाऱ्या. 2 पाहा — जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे लागतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे लागतात, तसे आमचे डोळे आमच्या पित्याकडे लागतात, जोपर्यंत तो आमच्यावर कृपा करीत नाही. 3 आमच्यावर कृपा कर, हे आमच्या पित्या, आमच्यावर कृपा कर, कारण आम्ही तिरस्काराने अगदी भरून गेलो आहोत. 4 सुखात असणाऱ्यांच्या थट्टेने आमचा जीव अगदी भरून गेला आहे, गर्विष्ठांच्या तिरस्काराने.