गायकवृंदाच्या प्रमुखासाठी. दाविदाचे स्तोत्र.
20 1 संकटाच्या दिवशी आमचा पिता तुला उत्तर देवो; याकोबाच्या पित्याचे नाव तुझे रक्षण करो. 2 तो पवित्रस्थानातून तुला साहाय्य पाठवो, आणि सीयोनेतून तुला आधार देवो. 3 तो तुझी सर्व अर्पणे स्मरो आणि तुझ्या होमार्पणाकडे प्रसन्नतेने पाहो. सेला. 4 तो तुझ्या मनातील इच्छा तुला देवो आणि तुझे सर्व बेत सिद्धीस नेवो.
5 आम्ही तुझ्या तारणावरून आनंदाने जयघोष करू, आणि आमच्या पित्याच्या नावाने आम्ही आपले ध्वज उभारू. आमचा पिता तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो. 6 आता मला ठाऊक आहे की आमचा पिता आपल्या अभिषिक्ताचे तारण करतो; तो आपल्या पवित्र स्वर्गातून आपल्या उजव्या हाताच्या तारक सामर्थ्याने त्याला उत्तर देतो. 7 कोणी रथांवर भरवसा ठेवतात व कोणी घोड्यांवर, पण आम्ही आमच्या पित्याच्या नावावर भरवसा ठेवतो. 8 ते ढासळतात व पडतात, पण आम्ही उठतो व स्थिर उभे राहतो. 9 हे आमच्या पित्या, तार राजाला! आम्ही हाक मारतो तेव्हा आम्हांला उत्तर दे.