त्याच्या सान्निध्यात कोण राहू शकतो?
दाविदाचे स्तोत्र.
15 1 पित्या, तुझ्या मंडपात कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र पर्वतावर कोण वास करू शकेल? 2 जो सात्त्विकतेने चालतो आणि जे योग्य ते करतो, जो आपल्या अंतःकरणातून सत्य बोलतो. 3 तो आपल्या जिभेने चहाडी करत नाही, आपल्या शेजाऱ्याचे नुकसान करत नाही, आणि आपल्या मित्राची निंदा करत नाही. 4 तो नीच माणसाला तुच्छ मानतो, पण आमच्या पित्याचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो; नुकसान सोसावे लागले तरी तो आपली शपथ पाळतो, आणि मागे हटत नाही. 5 तो व्याजाने आपले पैसे उसने देत नाही, आणि निर्दोषाविरुद्ध लाच घेत नाही. जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.