त्याची प्रेमदया, सर्वकाळ
136 1 आमच्या पित्याचे उपकार माना, कारण तो चांगला आहे; कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 2 सर्व पित्यांहून थोर अशा आमच्या पित्याचे उपकार माना, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 3 अधिपतींच्या अधिपतीचे उपकार माना, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.
4 जो एकटाच महान अद्भुते करतो त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 5 ज्याने ज्ञानाने आकाश निर्माण केले त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 6 ज्याने पाण्यांवर पृथ्वी पसरली त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 7 ज्याने मोठे ज्योति निर्माण केले त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 8 दिवसावर अधिकार चालवण्यासाठी सूर्य, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 9 रात्रीवर अधिकार चालवण्यासाठी चंद्र व तारे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.
10 ज्याने मिसराच्या प्रथमजन्म्यांद्वारे मिसरावर प्रहार केला त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 11 आणि त्यांच्यामधून इस्राएलाला बाहेर आणले, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 12 समर्थ हाताने व उगारलेल्या बाहूने, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.
13 ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 14 आणि इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 15 पण फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात लोटले, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.
16 ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.
17 ज्याने मोठ्या राजांवर प्रहार केला त्याचे, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 18 आणि पराक्रमी राजांना ठार केले, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 19 अमोऱ्यांचा राजा सीहोन, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 20 आणि बाशानाचा राजा ओग, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 21 आणि त्यांचा देश वतन म्हणून दिला, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 22 आपला सेवक इस्राएल याला वतन म्हणून, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.
23 आपण दीन झालो असता ज्याने आमची आठवण केली, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 24 आणि आमच्या शत्रूंपासून आम्हांला सोडवले, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते. 25 जो प्रत्येक जिवंत प्राण्याला अन्न देतो, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.
26 स्वर्गाच्या पित्याचे उपकार माना, कारण त्याची प्रेमदया सर्वकाळ टिकते.